You are currently viewing पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमिता दोडामार्ग भाजपकडून सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमिता दोडामार्ग भाजपकडून सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप

दोडामार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा सप्ताहानिमित्त आज दोडामार्ग येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सॅनिटायझर स्टॅन्ड वाटप केले.
दोडामार्ग नगरपंचायचे प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण व मित्र मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय तहसीलदार कार्यालय तसेच एस. टी डेपो येथे सॅनिटायझर स्टॅन्ड दिले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते शैलेश दळवी, पं. स सदस्य बाळा नाईक, समीर रेडकर, सुनील गवस, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, मिलिंद नाईक, दीपक गवस,रंगनाथ गवस, गुंडू मणेरीकर, प्रकाश गवस तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ज्ञानेश्वर ऐवळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 5 =