You are currently viewing देशाच्या 75 व्या स्वतंत्रदिन (आझादी का अमृत महोत्सव) या कार्यक्रमानिमित्त् प्रधानमंत्री ग्रामसडक योजनो कार्यालया अंतर्गत वृक्ष लागवडीबाबत

देशाच्या 75 व्या स्वतंत्रदिन (आझादी का अमृत महोत्सव) या कार्यक्रमानिमित्त् प्रधानमंत्री ग्रामसडक योजनो कार्यालया अंतर्गत वृक्ष लागवडीबाबत

वैभववाडी

सन 2021 यावर्षी देशाच्या 75 व्या स्वतंत्रदिन (आझादी का अमृत महोत्सव) साजरा करण्यात येणार आहे. या निमित्याने ग्राम विकास मंत्रायल तथा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय नवी दिल्ली मार्फत रस्त्यालगल वृक्ष लागवडीचा कार्यक्रम देशभरात हाती घेण्यात आलेला आहे. याबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यावर वृक्ष लागवड दि.19 जुर्ले 2021 ते 25 जुर्ले 2021 या कालावधीमध्ये करण्याबाबत शासनाकडून सुचीत करण्यात आलेले आहे.

त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पुर्ण् झालेल्या चाफेखाल मळगांव रस्ता ता.मालवण ,कोटकामते आडीवरे रस्ता ता.देवगड, तिथवली डिगशीवाडी रस्ता ता. वैभववाडी, मोतोंड पलतड तुळस रस्ता ता. वेंगुर्ला, फोंडा कळणे रस्ता ता. दोडामार्ग या रस्त्यावर एकुण 330 रोपांची वृक्ष लागवड करावयाचे उदीष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी आज दि.20 जूर्ले 2021 रोजी तिथवली डिगशीवाडी रस्ता ता. वैभववाडी या रस्त्यावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनि अभियंता श्री. प्रसाद पुरी व शाखा अभियंता श्री अमोल कोचरेकर मक्तेदार श्री.सूयोग तावडे व तिथवली येथील ग्रामस्थ सामाजीक वनीकरण विभागाचे वनक्षेत्राल श्री. प्रकाश पाटील व कार्यालयीन कर्मचारी सहदेव नेवाळकर यांनी वृक्ष लागवड केलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + ten =