You are currently viewing . जे. सोमैया विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा “पुनश्च अस्मिता” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

. जे. सोमैया विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा “पुनश्च अस्मिता” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला

*क. जे. सोमैया विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा “पुनश्च अस्मिता” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला*

क. जे. सोमैया विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय , विद्याविहार येथे मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने “पुनश्च अस्मिता” हा मराठमोळा संगीत आणि नृत्याविष्काराने बहरलेला कार्यक्रम शनिवार, दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी सोमैया महाविद्यालय परिसरातील श्रीमती साकरबेन करमशी सोमैया सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. १९९७ पासुन महाविद्यालयातील एका खोलीतून सुरु झालेला हा वार्षिक मराठमोळा कार्यक्रमाला आज आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे स्वरुप प्राप्त झाले. आजच्या या कार्यक्रमाचे निमित्त होते ते “अस्मिता” च्या स्थापनेपासून म्हणजेच १९९७ च्या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांपासून २०२२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यातील पुढची पिढी यांना एकत्रित आणून तोच जल्लोष आणि तोच उत्साह पुन्हा एकदा आजी-माजी विद्यार्थ्यांनी अस्मिताच्या या रंगमंचावर अनुभवत पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयीन आयुष्याला स्पर्शून गेला.

रंगमंच आणि नटराजाचे पूजन, दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रार्थना करण्यात आली. बासरी कलाकार श्री. प्रसाद यांच्या बासरीवर गणरायाचे सुर निरागस हो ही धून वाजवत “पुनश्च अस्मिता” कार्यक्रमाची सुरुवात एका पेक्षा एक सुंदर गाण्यांनी झाली आणि हो या संपूर्ण वाद्यवृंदाचे कलाकार सुद्धा तेच माजी विद्यार्थी होते त्यांनी एकेकाळी आपल्याच महाविद्यालयातील रसिक श्रोतांना आपल्या आवाजाने, सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मनोज बेलीकट्टी, श्री. स्वप्निल परशुरामी, श्री. रोशन कदम यांनी केले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा प्रभू यांनी आपल्या मार्गदर्शनपर शब्दात “अस्मिता” च्या या प्रवासाचे आणि आजतागायत मिळत असलेल्या यशाबद्दल सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मराठी वाड्.मय मंडळाच्या डॉ. स्मिता परांजपे, डॉ. जितेंद्र पेंढरकर, डॉ. योगेश घळसासी, वर्षा पेजवाल, मेधाविनी खरे, आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून साकारलेल्या “पुनश्च अस्मिता” या कार्यक्रमाची सांगता मराठी पाऊल पडते पुढे या गीताने आणि पसायदानाने झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम पुनश्च साजरा होत रहावा आणि पुन्हा हा अनुभव आम्हाला जगता यावा ही इच्छा माजी विद्यार्थी आणि अस्मिता प्रमुखांनी उपस्थित मान्यवरांपुढे व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आणि २०२२ च्या आंतरमहाविद्यालयीन “अस्मिता” कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा