You are currently viewing उंबर्डे ते एडगांव, करुळ ते वैभव वाडी रस्त्याची चाळण

उंबर्डे ते एडगांव, करुळ ते वैभव वाडी रस्त्याची चाळण

वैभववाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर यांनी वेधले बांधकाम विभागाचे लक्ष

वैभववाडी

उंबडे ते एडगाव, करुळ ते वैभववाडी मार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. या मार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपघातास निमंत्रण ठरत असलेल्या या मार्गाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वैभववाडी तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले आहे.

यावेळी वसंत अनंत नाटेकर (तालुका उपाध्यक्ष), अशोक सिताराम राणे (तालुका सेवादल अध्यक्ष), श्रीमती मीनाताई बोडके (तालुका महिला अध्यक्ष) उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा