You are currently viewing लेखी आश्वासनानंतर डेगवे मोयझर ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

लेखी आश्वासनानंतर डेगवे मोयझर ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

डेगवे

डेगवे मोयझर वरचीवाडी येथील रस्ताप्रश्नी ग्रामस्थानी रविवारी स्वातंत्रदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले. सरपंच वैदही देसाई यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थानी उपोषण स्थगित केले. ३० ऑगस्टपर्यत नादुरूस्त रस्त्याची डागडुजी करण्याबरोबर पावसाळा संपल्यानंतर निधी वरीष्ठ स्तरावरुन आणुन रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येईल असे आश्र्वासन सरपंच देसाई यांनी दिले.

३० ऑगस्टपर्यत रस्त्याची डागडुजी न झाल्यास आणि मार्चपर्यत खडीकरण, डांबरीकरण न झाल्यास पुन्हा उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थानी दिला. उपोषणात संजय द. देसाई, मंदार देसाई, संजय देसाई, रावजी देसाई, भरत देसाई प्राची देसाई, अमोल देसाई, गणेश देसाई, शशिकांत देसाई, शिवाजी देसाई, संजिवनी देसाई समिक्षा देसाई, मेधा देसाईआदी सहभागी झाले होते. उपोषण कर्त्याशी सरपंच वैदही देसाई, उपसरपंच प्रविण देसाई, माजी सरपंच मंगलदास देसाई, माजी उपसरपंच मधु देसाई, सुनिल देसाई, दादा देसाई, ग्रामसेविका लिना प्रभु आदींनी चर्चा केली. विकास सोसायटीचे राजन देसाई, प्रविण देसाई, ग्रामपंचायत सदस्यानी पाठींबा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा