You are currently viewing राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसाठी अमित सामंत यांनी केला थेट मंत्र्यांना फोन…

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसाठी अमित सामंत यांनी केला थेट मंत्र्यांना फोन…

नगर विकास राज्य मंत्र्यांनी घेतली उपोषणाची गंभीर दखल दोषींवर कडक कारवाई होण्याचे दिले संकेत…

दोडामार्ग

कसई-दोडामार्ग नगरपंचायत ने सक्शन वँन, स्ट्रीटलाईट,अग्निशामक बंब खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेकर, माजी नगरसेवक रामचंद्र ठाकुर यांनी आरोप करत आज स्वांतत्र्यदिनी उपोषण केले असता राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पदाधिकारी यांच्यासाठी थेट नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांचे लक्ष वेधले. उपोषण स्थळांवरुन फोन लावत लक्ष वेधले असता खरेदीमध्ये झालेल्या घोटाळ्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे वचन दिले. त्यानुसार मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांना जिल्हाधिकारी यांना याबाबत तात्काळ अहवाल पाठवा असे आदेश राज्यमंत्री श्री.तानपुरे यांनी दिले आहे. त्यानुसार मुख्याधिकारी गायकवाड यांनी लेखी पत्र दिल्याने हे उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस नेते सुरेश दळवी, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत मागे घेण्यात आले.

यावेळी संदिप गवस, सुदेश तुळसकर, दिपक जाधव, सागर नाईक, रविंद्र बांदेकर, मिनाक्षी देसाई, मोहिनी रेडकर, सुशांती राऊत, लिना कुबल, लवु मिरकर, प्रशांत नाईक, गोपाळ ठाकुर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा