You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे आजोळी होणार जंगी स्वागत…!

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे आजोळी होणार जंगी स्वागत…!

नांदगाव येथे नियोजनासाठीची बैठक संपन्न

नांदगाव

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ आॕगस्ट रोजी आगमन होत असून नांदगाव येथे २६ आॕगस्ट रोजी सकाळी १० वा. त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. नांदगाव हे नारायण राणेंचे आजोळ असल्यामुळे येथे राणेंचे जंगी स्वागत करण्यासाठी नांदगाव तिठा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक गोट्या सावंत यांच्या उपस्थित संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसभापती प्रकाश पारकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, तोंडवली सरपंच मनाली गुरव, आयनल सरपंच बापू फाटक, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, उमेश कुडतरकर, योगेश सदडेकर, विलास कांडर, मारुती मोरये, कमलेश पाटील, राजू तांबे, प्रल्हाद कुडतरकर, किशोर मोरये आदी कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा