You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयास विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ यांची सदिच्छा भेट

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयास विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ यांची सदिच्छा भेट

सावंतवाडी

सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयास पिंपरी-चिंचवड माजी उपमहापौर, तथा विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी मध्यंतरी राष्ट्रवादी जिल्ह्यात बॅक फुटवर गेली होती. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील आताच चित्र पहाता तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकेल असा विश्वास पिंपरी-चिंचवड माजी उपमहापौर, तथा विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यापार दर्शना बाबर-देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा