You are currently viewing उद्या १ डिसेंबर रोजी सावंतवाडी तालुक्यातील सरमळेत श्री देवी सातेरी, भगवती चा वार्षिक जत्रोत्सव

उद्या १ डिसेंबर रोजी सावंतवाडी तालुक्यातील सरमळेत श्री देवी सातेरी, भगवती चा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील सरमळे येथील श्री देवी सातेरी, भगवती चा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी पूजा, अर्चा, अभिषेक होईल. त्यानंतर ओटी भरणे, नवस बोलणे, फेडणे, केळी ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री देवीच्या सवाद्य पालखी मिरणूकीनंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. तरी येणाऱ्या सर्व भाविकांनी व नाट्य रसिकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरमळे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा