सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस शिरोडा येथे स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देणार
तरूणांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा. स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा. या उद्देशाने व्यर्थ न हो बलिदान हे अभियान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ने सूरू केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसनेही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2021 रोजी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मीठाचा सत्याग्रह ज्या ऐतिहासिक ठिकाणी झाला होता, त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकाराणीचे पदाधिकारी व सदस्य, प्रदेश प्रतिनिधी, सेल व फ्रंटल विभागाचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष,तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व शहर अध्यक्ष,आजी माजी पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांनी सकाळी 10.30 वाजता शिरोडा येथे कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व काँग्रेस पक्षाने केले. पक्षाच्या अनेक कार्यकर्ते, नेते यांनी तुरूंगवास भोगला अनेकानी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतू काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश ज्यावेळी स्वतंत्र झाला. या देशात दोनवेळचे अन्न गोरगरीब जनतेला मिळणे दुरापास्त होते. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे सरकार देशात आले.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली आधुनिक भारताचा पाया रचला गेला. त्यानंतर लालबहाद्दूर शास्त्री,इंदिराजी गांधी,राजीवजी गांधी, पी.व्ही. नरसिंहराव,मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली 1947 मध्ये अडचणीत असलेला देश जगातील प्रगत देशांबरोबर अनेक बाबतीत स्पर्धा करू लागला. देशाला महासत्तेच्या उंबरठ्यावर आणुन ठेवण्याचे काम केंद्रात असलेल्या काँग्रेसच्या सरकारने केले. हा खरा इतिहास नव्या पिढीला कळावा. यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत.