You are currently viewing ४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा पारितोषिक वितरण…!

४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धा पारितोषिक वितरण…!

ढ मंडळ कुडाळ संघाच्या ‘ बिलीमारो ‘ एकांकिकेने पटकाविला प्रथम क्रमांक…!

*जिराफ थिएटर्स ‘ स्टार ‘ द्वितीय तर माध्यम कलामंच , ए आय ‘ एकांकिकेला तृतीय…!*

कणकवली :

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या ४४ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटाचा निकाल जाहीर झाला आहे.या स्पर्धेत ढ मंडळ कुडाळ संघाच्या ‘ बिलीमारो ‘ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.जिराफ थिएटर्स , मुंबईच्या ‘ स्टार ‘ एकांकिकेला द्वितीय , तर माध्यम कलामंच , मुंबईच्या ‘ ए आय ‘ एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला आहे.क्रिएटिव्ह कार्टी , मुंबई संघाच्या ‘ मर्सिया ‘ , तर इंपिरिकल फाऊंडेशन , कल्याणसंघाच्या टाहो एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले .

या या स्पर्धेचा सविस्तर निकालपुढील प्रमाणे-

दिग्दर्शन १. तेजस मस्के ( बिलीमारो ) , २. बॉबी ( स्टार ) , ३. शीतल तळपदे ( ए आय ) , तांत्रिक अंगे १. स्टार ( जिराफ ) थिएटर्स , मुंबई ) , २. बिलोमारो ( ढ मंडळ कुडाळ ) , ३. विठाबाईचा कावळा ( नवरत्न कोकण परिवार मुंबई ) अभिनय पुरुष १. विठ्ठल तळवळकर ( बिलोमारो ) २ अनिल आव्हाड ( स्टार ) , ३. औंदुबर बाबर ( हॅण्डसम ) अभियन : स्त्री १ . रुपाली चव्हाण ( मर्सिया ) , २. साजिरी जोशी ( एआय ) , ३. अक्षता टाळे ( स्टार ) , उत्तेजनार्थ रितेश आफ्रे , दिनेश राजू मनवानी , साक्षी मांजरेकर , आर्या मिरे , आदिती देवर्शी , सिद्धी शिंदे यांनी पटकाविले . एकांकिका स्पर्धेतील एकांकिकेचा लेखक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असेल व त्याचे लेखन परिक्षकांना भावले असेल तर अशा लेखकास मामा वरेरकर लेखन पुरस्कार दिला जातो . यावर्षी हा मामा वरेरकर लेखन पुरस्कार कुडाळ संघाच्या बिलीमारो एकांकिकेचे लेखक तेजस मस्के यांना मिळाला . स्पर्धेचे परीक्षण प्रदीप वैद्य , चित्तरंजन गिरी , आदिती गिरी यांनी केले . स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . यावेळी चित्तरंजन गिरी , आदिती गिरी , संस्थेचे कार्याध्यक्ष वामन पंडित , अँड.नानू देसाई ,उमेश बाळके , लिना काळसेकर,मिलिंद बेळेकर ,राजा राजाध्यक्ष, प्रसन्ना देसाई,आदी मान्यवर उपिस्थत होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × one =