You are currently viewing वैभववाडी येथील आरोग्य शिबिरात 289 रुग्णांची तपासणी

वैभववाडी येथील आरोग्य शिबिरात 289 रुग्णांची तपासणी

वैभववाडी
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे, आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी व बी के एल वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 289 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धर्मे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स अल्सर,मोतीबिंदू, मुळव्याध, मुतखडा, चरबीचे आजार, कार्डियाक, थायरॉईड, कान नाक घसा, महिलांच्या गर्भाशयाचे शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, या शिबिरामध्ये घेण्यात आल्या. या शिबिरासाठी बी. के. एल वालावलकर डेरवन येथील रुग्णालयाची टीम, ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथील टीम, श्री माऊली क्लिनिकल लॅबोरेटरी वैभववाडी व रावराणे आय केअर वैभववाडी यांच्या बहुमोल सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.
या प्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था स्थानिक अध्यक्ष सज्जन काका रावराणे, संस्था सचिव प्रमोद रावराणे, प्राचार्य डॉ. काकडे, जि. प.सदस्य सुधीर नकाशे, राजेंद्र राणे, उत्तम सुतार, मनोहर फोंडके, महेश रावराणे, किशोर दळवी, श्री. नवलराज काळे, अभयसिंह रावराणे, लुपिन फाऊंडेशनचे प्रवीण पेडणेकर, महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये रक्त तपासणी (मधुमेह व हिमोग्लोबिन) – 40, ECG – 27, कान नाक घसा (ENT) 30, डोळे तपासणी (मोतीबिंदू-87) – 120, गर्भाशय आजार (Gynac) – 12, हाडांचे आजार (Ortho) – 29, इतर आजार (थायरॉईड, मुतखडा, मूळव्याध, त्वचारोग इ.) – 31इ. यानंतर यामध्ये ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची व इतर उपचारांची गरज आहे अशा रुग्णांना मोफत/अल्पदरात पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =