You are currently viewing घर बांधणीसाठी लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवकांनी योग्य मार्गदर्शन करावे- आ.वैभव नाईक

घर बांधणीसाठी लाभार्थ्यांना सरपंच व ग्रामसेवकांनी योग्य मार्गदर्शन करावे- आ.वैभव नाईक

प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत कुडाळ पंचायत समिती येथे डेमो हाऊसचे उदघाटन

कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात तशाच प्रकारचा डेमो हाऊसचा उपक्रम राबविण्यात आला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.डेमो हाऊसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कमीत कमी खर्चात आपले घर कशा पद्धतीने उभारता येईल हे जाणून येत आहे.अशा प्रकारची घरे बांधण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी देखील आपआपल्या गावात लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.जेणेकरून लाभार्थ्यांना चांगले घर उभारता येईल.तसेच शासनाच्या अन्य योजना देखील तळागाळापर्यत पोचविण्याचे काम गावातील लोकप्रतिनिधी ,शासकीय यंत्रणांनी केले पाहिजे यासाठी माझ्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य लाभेल असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग व पंचायत समिती कुडाळ यांच्या माध्यमातून कुडाळ पंचायत समिती शेजारी उभारण्यात आलेल्या डेमो हाऊसचे उदघाटन जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी फलकाचे अनावरण करण्यात आले.कुडाळ पंचायत समिती येथे झालेल्या उदघाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायतमध्ये आंब्रड ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक आला आहे.त्याबद्दल प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सरपंच विठ्ठल तेली यांचा सत्कार करण्यात आला. इतर विजेत्या ग्रामपंचायतींना देखील गौरविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी भोई, सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, पंचायत समिती सदस्य श्रेया परब, अनघा तेंडोलकार, मिलिंद नाईक, श्रीम.वालावलकर, चंद्रकांत मंडव ,आदिंसह अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व लाभार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =