You are currently viewing भास

भास

भासते काहीतरी सतत्,
तुझ्यात हरवल्यासारखे..
अन आठवण येते तुझी,
मन घायाळ झाल्यासारखे.

कळत नाही का बांधले,
तुझ्या रूपाचे मूर्तिमंत मंदिर…
मनाच्या गाभाऱ्यात राहूनही,
वाटते अधीर झाल्यासारखे.

देहरूपी मूर्ती तुझी हसरी,
दिसूनही नसल्यासारखे..
स्वप्नातच डुंबून राहतो,
अन वाटते जाग आल्यासारखे.

कितीक केले विचार तुझे,
मन फिरले गरगर वादळासारखे..
स्वार होऊनी त्या विचारांवरती,
बसविले अंतर्मनात देवासारखे..

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा