You are currently viewing गणेशोत्सवा पूर्वी गावोगावची एसटी सेवा नियमित सुरू करा

गणेशोत्सवा पूर्वी गावोगावची एसटी सेवा नियमित सुरू करा

भाजपा आमदार नितेश राणे यांचे एसटीच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांना पत्र

कणकवली :
गणेशोत्सवाच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामिण भागातील एस.टी. सेवा नियमित सुरू ठेवा. कोरोना काळात बंद केलेल्या एसटीच्या फेऱ्या पूर्वरत सुरू करा.मुंबई, पुणे येथील चाकरमानी मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत त्यांना गावी जाण्यासाठी गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या.घरोघरी गणपती असल्यामुळे गावातून शहरात,बाजारपेठेत जनतेला येण्याजण्यासाठी एसटी सेवा सुरळीत सुरू ठेवा अशा सूचनांचे पत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी एसटी च्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक यांना दिले आहे.

यावर्षीचा गणेशोत्सवास १० सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे . त्यानिमित्त परंपरेनुसार कोकणातील प्रत्येक घरात बाहेर गावाहून चाकरमानी मंडळी येणार आहेत . कोकण रेल्वेने चाकरमान्यांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात जादा फेऱ्या सुरू केल्या असून , शासन स्तरावरही मुंबई ठाणे पुणे व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या गणेश भक्तांसाठी सेवा देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत .

गणेशोत्सवा निमित्त गावागावात येणाऱ्या प्रवाशांसाठी तालुक्याच्या ठिकाणाहून गावात जाणाऱ्या एसटी च्या फेऱ्या नियमितपणे सुरू होणे जरूरीचे आहे . सद्या कोविड १९ मुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.त्या लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करा असे पत्राद्वारे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक यांना दिलेल्या पत्रातून सूचित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा