You are currently viewing श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यू. कॉलेज जासई मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा …..

श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यू. कॉलेज जासई मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा …..

उरण – रायगड जिल्हा:-

रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यू. कॉलेज जासई, ता. उरण जि. रायगड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मोठया उत्साहात भक्ती भावाने साजरा करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय मजदूर संघांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कामगार नेते सुरेश पाटील यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेबानी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र आम्हा भारतीयांना दिला असे मनोगतात सांगितले.

विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर मा. अरुण घाग यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन चरित्र्याची माहिती दिली.या प्रसंगी गाव अध्यक्ष आणि सल्लागार समिती सदस्य यशवंत घरत, डी. के. पाटील, ठाकूर एस. एम. मुंबईकर, राजू भोईर हे सेवक उपस्थित होते.

रयत सेवक संघांचे उपाध्यक्ष नुरा शेख सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =