You are currently viewing गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी एसटीच्या जादा फेऱ्या कमी तिकीट दरात सोडा

गणेशोत्सव काळात कोकणवासीयांसाठी एसटीच्या जादा फेऱ्या कमी तिकीट दरात सोडा

संदेश पारकर यांनी परिवहनमंत्री ना.अनिल परब यांचे वेधले लक्ष

कणकवली

महाराष्ट्र राज्यावर आलेले कोरोनाचे संकट अजुनही पुर्णपणे गेलेले नाही. कोकणात गणेशोत्सव हि मुंबई तसेच इतर जिल्हात कामानिमित्त राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक पर्वणीच असते. वर्षातुन एकदाच येणाहा हा सण कोकणवासीय श्रद्धेने भक्तिभावाने मोठ्या उत्साहात साजरा करतात.
अश्या आमच्या चाकरमानी कोकण वासीयांच्या श्रद्धेचा तसेच भावनांचा विचार करता कोकणी जनतेला गणपती उत्सवासाठी एसटीच्या जास्तीत जास्त फेऱ्या कोकणात पाठवाव्यात अशी आमची मागणी आहे. तसेच कोरोना काळात बेरोजगारीचे संकट आलेले असल्याने कोकणी जनतेला नेहमीपेक्षा कमी दरात तिकीट मिळावे अशी देखील आग्रही मागणी केली आहे.
महापुरामुळे कोकणातील रस्त्यांची खूपच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या सुस्थितीत असलेल्या गाड्या पाठवणे गरजेचे आहे याचा देखील प्राधान्याने विचार होणे गरजेचे आहे.

या मागण्यांसह सिंधुदुर्ग एसटी विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व आगारांच्या खालीलप्रमाणे महत्वाच्या समस्या व मागण्या आहेत.

1) सावंतवाडी बसस्थानक साठी 9 कोटी रुपये मंजूर असूनही अद्याप केवळ 20 टक्केच निधी खर्च झाला आहे. तरी मंजुर निधी खर्ची घालून उरलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत.
2) दोडामार्ग आणि वैभववाडी तालुक्यासाठी नवीन आगरांची निर्मिती करण्यात यावी.
3) जिल्ह्यातील बांदा आणि कुडाळ येथील बसस्थानके व्यावसायिक व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यास मंजुरी मिळावी.
4) 2019 आली सहाय्यक मेकॅनिक या पदांवर भरती झालेल्या 18 जणांना त्वरीत सेवेत रुजु करून घ्यावे.
5) जिल्ह्याला सद्यस्थितीत नियमित विभाग नियंत्रक नसल्याने कायमस्वरूपी विभाग नियंत्रक नेमणेत यावा.
6) सावंतवाडी, वेंगुर्ला, विजयदुर्ग येथे देखील नियमित आगार व्यवस्थापक नेमणेत यावेत.
7) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांवर त्वरीत नेमणुका करणे गरजेचे आहे.
8) अपुऱ्या कार्यशाळा कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करणे गरजेचे आहे.

निवेदनाची दखल घेऊन वरील सर्व मागण्या मंजुर करण्यात याव्यात  अशी मागणी संदेश भास्कर पारकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + twenty =