You are currently viewing घावनळे गावामध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यू

घावनळे गावामध्ये आठ दिवसाचा जनता कर्फ्यू

१९सप्टेंबर ते २६ सप्टेंबर सर्व हॉटेल दुकाने आस्थापने बंद’चा निर्णय

कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने विविध उपाययोजना ग्रामस्तरावर केल्या जात आहेत. दरम्यान घावनळे गावात पहिला कोरोना रुग्ण मिळाल्याने आज घावनळे ग्रामपंचायत मधे उपसरपंच दिनेश वारंग यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य व ग्रामदक्षता समिती कोविड-१९ यांची सभा पार पडली. या सभेत शनिवार दि. १९ पासुन शनिवार दि. २६ सप्टेंबर पर्यंत सर्व दुकाने हॉटेल तसेच सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
त्याचप्रमाणे वाहन चालक-मालक यांनी स्वेच्छेने संचारबंदी करावी व अत्यावश्यक सेवेव्यतीरीक्त बाहेर पडू नये व सर्वांनी जनता कर्फूचे पालन करावे. व कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − ten =