कुडाळ :
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते रणजित देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वाचनालयाला सुमारे २.५० लाख रुपये किमतीची १०४४ पुस्तके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास संस्थेचे उपकार्याध्यक्ष अविनाश तळेकर, एडवोकेट अजित भणगे, एडवोकेट राजीव बिले, सामंत सर, आनंद वैद्य, आनंद जामसांडेकर व कुडाळ शहरातील नागरिक उपस्थित होते.