You are currently viewing बॅ. नाथ पै प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन

बॅ. नाथ पै प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन

बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिर्सच अकॅडमी कुडाळ या नर्सिंग महाविद्यालयामध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर पुणे यांचे कँम्पस इटरव्हू

कुडाळ :

बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिर्सच अकॅडमी कुडाळ या महाविद्यालयामध्ये अंतिम वर्ष बी.ए.स्सी व अंतीम वर्ष जी.एन.एम या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी बॅ.नाथ पै प्लेसमेंट सेल अंतर्गत कँम्पस इटरव्हूचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधीचा लाभ मिळावा. तसेच कोरोना महामारीच्या काळात बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक बांधीलकीच्या नात्याने व प्रशिक्षीत नर्सेसना योग्य रोजगाराची संधी मिळावी. या उददेशाने बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.उमेश गाळवणकर, यांच्या सहकार्यातून व कॅम्पस प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून कँम्पस इटरव्हूचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्हूमध्ये बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिर्सच अकॅडमी कुडाळ मधील अंतिम वर्ष बेसिक बी.ए.स्सी च्या 35 विद्यार्थी-विद्यार्थीनी व अंतीम वर्ष जी.एन.एम च्या 20 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग घेतला. त्यांना लवकरच नियुक्ती पत्र दिली जाणार आहेत.

या कार्यक्रमाला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर पुणे यांचे कडून सौ. रेवती माणगावकर नर्सिंग डायरेक्टर, साै कोमल परब नर्सिंग अधीक्षक उपस्थीत होत्या. या प्रसंगी बॅ.नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँण्ड रिर्सच अकॅडमी च्या प्राचार्या सौ मीना जोशी, उपप्राचार्या सौ.कल्पना भंडारी, बॅ.नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरॅपी चे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला तसेच प्रा.वैशाली ओटवणेकर, प्रा.ज्योती साकीन, प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रा.प्रणाली मयेकर, प्रा.सुमन करंगळे- सावंत, प्रा.वैजयंती नर, प्रा.पुजा म्हालटकर,प्रा.रेश्मा कोचरेकर, प्रा.प्रियांक माळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा