You are currently viewing पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार ठाकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार ठाकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतल्या जाणा-या दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील सर्व विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष,ठाकर समाजातील ज्येष्ट लोककलाकार, पद्मश्री पुरस्कार सन्मानित पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे.
या गुणगौरव कार्यक्रमामध्ये विद्यार्थी यांना प्रशस्तिपत्र, भेटवस्तु देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी येथे साजरा होणार आहे. यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थी यांना विशेष करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांनी  चेतन परशुराम गंगावणे मो. नं ९९८७६५३९०९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोरोना आजाराच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 14 =