You are currently viewing माजी आमदार कै. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या शोकसभेचे आयोजन

माजी आमदार कै. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या शोकसभेचे आयोजन

मल्हार फौंडेशन (रजि.), नालासोपारा (जि. पालघर) यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे विश्वविक्रम करणारे, शेतकरी, कामगारांचे कैवारी अकरा वेळा आमदार राहिलेले माजी आमदार कै. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख यांच्या शोकसभेचे आयोजन केले होते.

त्याचाच भाग म्हणून गुरुवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ऑनलाईन गूगल मीट द्वारे शोकसभेचे आयोजन केले होते.

या शोकसभेस विमा अधिकारी मा. हनुमंत सुळे, समाज नेते मा. बाबुराव सुळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते मा. बाळू मामा लेंगरे,माजी मुख्याध्यापक मा. हिम्मत नंदाळे, धनगर माझाचे संपादक मा. धनंजय तानले, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष मा. नवलराज काळे यांनी मा. आबासाहेबाच्या आठवणींला उजाळा दिला त्याचप्रमाणे या शोकसभेसाठी बहुसंख्येने बहुजन समाजबांधव आणि मल्हार फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

तसेच या शोकसभेचे सुत्रसंचालन मा. महादेव इरकर सर यांनी केले आणि आभार मल्हार फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. रणजित सुळे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा