आमदार नितेश राणे यांची राज्य शासनाकडे मागणी
कणकवली :
देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2019 मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टी ग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती. तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात राणे यांनी म्हटले आहे, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने जाहीर केलेल्या 11 हजार 500 कोटींचे पॅकेज मधून संकटग्रस्त यांच्या वाट्याला फार कमी मदत येणार आहे. आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मदतीसाठी 7 हजार कोटी दीर्घकालीन उपाय योजनांसाठी तर 3 हजार कोटी पुनर्बांधणी पुनर्वसनासाठी आहेत 7 हजार कोटींची योजना रुपी मदत मिळेल तेव्हा मिळेल. पण सध्या संकट असताना तातडीने रोखण्याची गरज आहे.