सावंतवाडी
गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे गटारे नाले भरलेले असून यावर झाडेझुडपे वाढलेले आहेत त्यामुळे सावंतवाडी शहरात डासांचे फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे यामुळे अनेक साथीचे रोग पसरवण्याचे दाट शक्यता असल्याने ही वाढलेली झाडे व गटारे नाले त्वरित साफ करावेत तसेच सावंतवाडी शहरातील रस्ते मोठमोठे खड्डे पडून अपघातास निमंत्रण देत आहेत असे रस्ते चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास दूर करावा याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले. तसेच शहरातील वाढणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत ही योग्य तो निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. विहिरी मधील दूषित पाणी यामुळे नगर पालिके मार्फत विहिरीत टाकण्यात येणारे औषध लवकरात लवकर टाकून पाणी निर्जंतुकीकरण नागरिकांना वापरण्यासाठी मिळावे आदी शहरातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शफीक खान, व्ही.जे.एन.टी. जिल्हाध्यक्ष अशोक पवार, व्यापार विभाग कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व व्यापार विभाग महिला जिल्हाध्यक्षा सौ दर्शना बाबर देसाई, युवती तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख, जिल्हा कार्यकारणी सदस्य ऑगस्तीन फर्नांडिस, संतोष जोईल, नियाज शेख, याकुब शेख, आसिफ ख्वाजा, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.