देवगड
उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देवगड तालुक्यात देवगड येथील श्रीमती एन एस पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालयची वाणिज्य शाखा विद्यार्थिनी प्राची प्रशांत मसुरकर हिने ६०० पैकी ५७२ गुण ९५.३३ टक्के मिळवून देवगड येथील एन एस महाविद्यालयातील चारही शाखात तसेच महाविद्यालय व देवगड तालुक्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत २१३ पैकी २१३ उत्तीर्ण या शाखेची विद्यार्थिनी प्राची प्रशांत मसुरकर ९५.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक, वाणिज्य शाखेची* यामिनी विलास नावगे , ९१% गुण मिळवून द्वितीय ईश्वरी जयराम कदम ८७.१६ % गुण मिळवून तृतीय उत्तीर्ण झाले.
*विज्ञान शाखेत* १५५ पैकी १५५ उत्तीर्ण होऊन प्रथम श्रेया मकरंद जोशी,८०.६६%, द्वितीय ओहम संदीप कुळकर्णी ७९.६६%, तृतीय अल्फिया अशपाक खान, ७९.०५%या प्रमाणे यशस्वी ठरले.
बारावी एमसीव्हीसी ७४ पैकी ७४ उत्तीर्ण होऊन प्रथम – कोमल अनंत घाडी, ७७.५०%, द्वितीय -सायली राजेंद्र गुरव,७६.५०%,तृतीय -समीक्षा दिनेश लाड, अनुश्री राजेंद्र घाडी ७४.१६%, यशस्वी ठरले.
कला शाखेतून २०२ पैकी २०२ उत्तीर्ण होऊन प्रथम सिद्धी किशोर कदम,७५.०५%,द्वितीय,मुस्कान फकरुद्दीन आगा -७४.६६%,तृतीय अमिषा संतोष मुळम ७१.८३% यशस्वी ठरले.
मिठबाव ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००%लागला असून २५ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कलाशाखेतून प्रथम, रश्मी संतोष मसुरकर ८३%, द्वितीय सोनाली दत्तात्रय तळगावकर, तृतीय मयुरी महादेव मोहिते ७५.८३% गुण प्राप्त केले.
श्री मो गोगटे माध्यमिक उच्च माध्यमिक (व्यवसाय)वि.म.जामसंडे या कनिष्ठ महाविद्यालयातून* ४१ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन इलेक्ट्रॉनिक टेकनोलॉजि प्रथम शैलेश महेश वाघरी ६०.०४%,द्वितीय सुरज सुनील ठुकरूल ६०%,तृतीय सागर मधुकर मोंडे ५८.०७%, *इलेक्ट्रिक टेकनोलॉजी* प्रथम पार्थ प्रसाद रानडे ६४.०२%,द्वितीय तेजस दशरथ वाडेकर,५८.०८% तृतीय चैतन्य बाळकृष्ण सुतार ५८.०५% *अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट* प्रथम -अनुश्री उमेश कामतेकर ६५.०७%,द्वितीय सानिका उदय करंगुटकर,६४.०४%,तृतीय विशाल अंकुश लाड ६३.०८%,या प्रमाणे यशस्वी ठरली.
शेठ म.ग.हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय देवगडचा निकाल १००%* लागला असून वाणिज्य शाखेतील ९ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .यात प्रथम क्रमांक – वर्षा गजानन घाडी ७६.०५%,द्वितीय -विघ्नेश सूर्यकांत केसव ७४.८३%,तृतीय -अमिषा पांडुरंग घाडी ६९.३३%,गुण प्राप्त केले. शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव* या प्रशालेचा बारावी परीक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात कला शाखेमधून अक्षता अशोक मनयारे ६१.३३%,द्वितीय -संतोष विठ्ठल वरक,६०.५०,तृतीय, अमन राकेश खाजनवाडकर, ५७.६७%,तर वाणिज्य शाखेतून प्रथम -गायत्री आनंद लाड, ७९.३३%, द्वितीय समृद्धी मधुकर मोर्वेकर, ७७.६७%,तृतीय-निशा नारायण पांढरमिसे ७७.३३% या प्रमाणे यशस्वी ठरले.
श्री भगवती हायस्कुल व स्व.वीणा सुरेश बांदेकर,ज्युनिअर कॉलेज मुणगे चा निकाल १००% लागला आहे .यात प्रथम -सायली संजय घाडी, ८०.६५%, द्वितीय -अनिकेत सुनील चिंदरकर, ८०.३३%,तृतीय कविता मनोहर मुणगेकर ७१.३३ हे यशस्वी ठरले.