You are currently viewing नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

… नमस्ते सदा वत्सले मातृभूमे…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील कोट्यवधी संघस्वयंकाना राष्ट्रजागरण, राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती आणि राष्ट्र निर्माणासाठी प्रेरणा आणि उर्जा देणारी सांस्कृतिक संघटना. पुढच्या वर्षी संघ शंभरावी गाठणार आहे. ज्या केरळमध्ये गोपी नांवाचे खासदार या निवडणुकीत निवडून आले आणि देशाचे पर्यटन मंत्री झाले यामध्ये संघस्वयंकाचे फार मोठे योगदान आहे..
देशातील अनेक संघस्वयंकाना देशातील आणि विशेषतः या निवडणुकीतील भाजपाच्या नेत्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे व अंधभक्तांचे जे आचरण व बोलीभाषा होते याबाबत संघ कान का टोचत नाही? जो काही सत्तेचा उन्माद सुरु आहे यावर संघ मौन धारण का करत आहे?.. पण आज नागपूर येथील संघ कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप कार्यक्रमात आदरणीय मोहनजी भागवत यांनी भाजप व भाजपाच्या शिर्शस्थ नेतृत्वाचे ज्या कठोर भाषेत कान टोचले हे ऐकून इतके दिवस या न पटणाऱ्या कार्यपद्धती बाबत मी जेव्हा समाज माध्यमातून व्यक्त होत होतो आणि संघ व भाजपा विरोधी म्हणून ट्रोल होत होतो त्या सगळ्या अंधभक्तांना आदरणीय मोहनजी भागवत यांनी अगदी सडेतोड उत्तर दिले.
आदरणीय मोहनजी भागवत म्हणाले ” ज्या पद्धतीने निवडणुक प्रचार झाला तो योग्य नव्हता. त्याचा अतिरेक झाला.तंञज्ञानाचा दुरूपयोग करून चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या.आपण विरोधी पक्ष म्हणणार नाही, तो प्रतीपक्ष आहे. . . आणि प्रतिपक्षाला आपले विचार व मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रतिपक्ष हे आपले विरोधक नाहीत. त्यांचा सन्मान केला पाहिजे. विद्या किंवा ज्ञान हे समाजप्रबोधनाचे साधन आहे. आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. सामाजिक एकोपा जपणे हे आपलं कर्तव्य आहे. आपला धर्म जसा श्रेष्ठ तसे देशातील इतरही धर्म श्रेष्ठच आहेत. यावेळी प्रचारात संघाला कारण नसताना ओढलं गेलं.
कर्तव्य बजावत असताना आपण केलेल्या कार्याबद्दल अहंकार असता नये. कर्तव्य बजावताना शिष्टाचार महत्त्वाचा असतो. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यानी मर्यादा पाळल्या पाहिजेत”
यावेळी आपल्या संबोधनात आदरणीय मोहनजी भागवत यांनी मणीपूरचा उल्लेख केला, “मणीपूर अजूनही जळत याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सामाजिक एकात्मता महत्त्वाची आहे. ”
थोडक्यात ज्या पद्धतीने आदरणीय मोहनजी भागवत यांनी भाजपाचे कान टोचले यावर भाजपातील शिर्शस्थ नेतृत्व, त्यांचे समर्थक आणि विशेषतः अंधभक्तांनी यावर चिंतन करण्याची गरज आहे.. ज्या कोट्यवधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या त्यागातून ही सत्ता भाजपाला मिळवून दिले.. त्या संघाची आता गरज नाही.. आम्ही आता स्वयंपूर्ण आहोत हे भाजपाच्या अखिल भारतीय अध्यक्षांचे जाहीर वक्तव्य यामुळेच मोदी सरकार सत्तेवर न येता एनडीएचे सरकार आले. निदान संघ परिवाराची शिर्शस्थ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याचीच राजकीय विंग भाजपाने निदान भागवतांच्या या मौलिक आणि देशहिताचे जाहीरपणे मांडलेले विचार गांभीर्याने घेऊन पुढील वाटचाल केली नाही तर भविष्यात भाजपाची ही काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही…
… अॅड नकुल पार्सेकर…
….. एक हितचिंतक…

संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा