You are currently viewing लसीकरणात वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना प्राधान्य द्या – जयेंद्र रावराणे

लसीकरणात वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना प्राधान्य द्या – जयेंद्र रावराणे

तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन

वैभववाडी
लसीकरणात ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीचे निवेदन माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांना दिले आहे. येथील शहरातील प्रमुख असलेल्या लसीकरण केंद्रावर व इतर केंद्रावर नागरिकांची झुंबड उडत आहेत.

लस मिळण्यासाठी पहाटेपासून नागरिकांच्या केंद्रावर लांबच लांब रांगा लागत आहेत. यात वयोवृद्ध व अपंग व्यक्तींची ससेहोलपट होत आहे. त्यांना लसीकरण केंद्रावरून लस न घेताच माघारी फिरावे लागत आहेत. बरेच वयोवृद्ध व्यक्तींचा दुस-या डोसची मुदत संपून महिने उलटले आहेत. तरीही त्यांना डोस मिळणे मुश्किल झाले आहे. या परिस्थितीत संबंधित विभागाने योग्य नियोजन करून वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना डोस उपलब्ध करून द्यावेत असे निवेदनात श्री रावराणे यांनी म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी सभापती शुभांगी पवार, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण, माजी नगरसेवक संजय सावंत, भाजपा महिला पदाधिकारी प्राची तावडे, राजन तांबे, भास्कर नादकर, निलेश तांबे, संदेश तुळसणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − 9 =