You are currently viewing मग आ वैभव नाईकांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता…

मग आ वैभव नाईकांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता…

राणेंना मायनिंग प्रकरणी जबाबदार धरणाऱ्या आ.नाईकांना अमित इब्रामपूरकर यांचा सवाल

कळणे मायनिंग नारायण राणे यांनी सुरू केले असा आरोप करणारे आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता. याची उत्तरे जनतेला द्यावी. असे आव्हान मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले आहे.

या मायनिंग ला जेवढे केंद्रीय मंत्री नारायण राणे जबाबदार आहेत. तेवढेच जबाबदार आमदार वैभव नाईक आहेत. असा आरोप त्यानी यावेळी केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी कळणे मायनिंग प्रकल्प आणला होता.गाडगीळ अहवालात तो कसा विनाशकारी आहे याविषयी स्पष्ट करण्यात आले आहे.पश्चिम घाटात पर्यावरणाचा अभ्यास करून संरक्षणा करता सूचना करण्या करता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मार्च २०१० मधे प्रा. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेत एका समितीची स्थापना केली. ऑगस्ट २०११ मधे समितीने आपला अहवाल सादर केला.या अहवालात ईको सेंसेटीव्ह झोनचे एक ते तीन भाग करण्यात आले होते. ईको सेंसेटीव्ह झोनचे एक मध्ये मायनिंग प्रकल्प,औष्णिक ऊर्जा प्रकल्प यांना परवानगी देवू नये अशी सूचना केली होती.
मग मायनिंग प्रकल्पाला गाडगीळ अहवालातून विरोध झाला असताना असा अहवाल आंदोलनात आमदार वैभव नाईक यांनी का जाळला? ते जनतेसमोर मांडावे असे आव्हान मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 2 =