You are currently viewing माजी आमदार जिजी उपरकर यांची साटेली- भेडशीतील गायरानास अचानक भेट..

माजी आमदार जिजी उपरकर यांची साटेली- भेडशीतील गायरानास अचानक भेट..

बेकायदेशीर उत्खनना संदर्भात तहसिलदार खानोलकर यांच्याशी केली चर्चा..

सुत्रधार असलेले बारिक मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता..

दोडामार्ग

तालुक्यातील साटेली- भेडशीमध्ये सुरु असलेल्या शासनाच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर जांभा दगड उत्खनन या संदर्भात तेथील शेतकरी वारंवार प्रशासनाला निवेदने देत आहेत . या विषयाला एक वर्ष पूर्ण होत आले परंतु अद्याप पर्यंत त्या जागेचा सर्वे झालेला नाही, तसेच अद्याप पर्यंत त्या प्रकरणाची उचीत अशी कारवाई सुद्धा झालेली नाही. या शेतकऱ्यांनी २६ जानेवरी रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण देखील केले होते परंतु प्रशासन वारंवार त्या प्रकरणा कडे काणडोळा करत आहे.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर हे कळणे माइनिंगचा बांध फुटून तेथिल ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घडलेल्या प्रकाराची पाहणी करण्या साठी आले असता त्यांनी अचानकच साटेली भेडशीतील शासनाच्या जमिनीत सुरु असलेल्या बेकायदेशीर उत्खनन स्थळी भेट दिली. व उत्खनन झालेल्या त्या भागाची पाहणी केली. पाहणी करून झाल्यावर त्यांनी लगेच दोडामार्ग तहसिलदार खानोलकर यांच्याशी चर्चा केली.
त्यावेळी उपरकर यांनी चर्चे दरम्यान तहसिलदार यांना या प्रकरणात उचित कारवाई व्हावी व या प्रकरणातील कोणाचेही नाव वगळण्यात येवू नये व त्या जमिनीचा लवकरात लवकर सर्वे करावा अश्या सुचना त्यांनी तहसिलदार यांना दिल्या.


उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किंनळेकर, दया मेस्त्री ,सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार ,राजेश टंकसाळी, नाना सावंत, संतोष सावंत, लक्ष्मीकांत हरमलकर, मनविसे तालुकाध्यक्ष अक्षय कुबल, शहराध्यक्ष सौरभ नाईक व साटेली – भेडशी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =