You are currently viewing संविधानाने देशातील प्रत्येकाला ” माणुसपणाचा ” अधिकार दिला

संविधानाने देशातील प्रत्येकाला ” माणुसपणाचा ” अधिकार दिला

*संविधानाने देशातील प्रत्येकाला ” माणुसपणाचा ” अधिकार दिला*

*माजी आमदार राजन तेली , सावंतवाडी विधानसभा प्रमुख – भाजपा*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मठ – सिद्धार्थनगर येथे ” संविधान गौरव ” कार्यक्रमाचे आयोजन*

भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली , त्याला यावर्षी ७३ वर्षे पुर्ण होत आहेत . देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो .
संविधानाची अनेक वैशिष्ट्य आहेत . समता , स्वातंत्र्य आणि बंधुता हे संविधानाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे . संविधानाच्या अस्तित्वाचे कारणच हे तत्व आहे . यासोबतच धर्मनिरपेक्षता , संघराज्य प्रणाली , संसदीय लोकशाही , कार्यपालीका , न्यायपालीका व कायदे मंडळ यांच्या पायावर उभी असलेली लोकशाही , ही संविधानाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत .
भारत देश हा लोकशाही राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे . हा लोकशाहीचा उस्तव पुढील हजारो वर्षे चालत रहाण्यासाठी राज्यघटना तिच्या पावित्र्यासह आणि उद्दिष्टांसह टिकली पाहिजे . लोकशाही टीकण्यासाठी संविधानाचे रक्षण होणे आवश्यक आहे , म्हणूनच भाजपाने ” संविधान गौरव पंधरवडा ” आयोजित केला असल्याचे राजन तेली यांनी सांगीतले .
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने मठ – सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरात संविधान पुजन व वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी सर्वप्रथम महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच रुपाली नाईक व संविधानाच्या प्रतिमेस मा. आम.राजन तेली यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे चंद्रकांत जाधव यांनी संविधानाचे वाचन करून शपथ घेतली .
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना(बाळू) देसाई , वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर , प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष प्रथमेशजी तेली , मठ सरपंच रुपाली नाईक , उपसरपंच बंटी गावडे , सोसा. चेअरमन सुभाष बोवलेकर , शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर , युवा नेते अजित नाईक , युवा मोर्चाचे प्रशांत बोवलेकर , ग्रा.पं.सदस्य संतोष वायंगणकर , समिक्षा धुरी , सोनिया मठकर , सिद्धी गावडे , उमेश मठकर , सुरेश मठकर , प्रशांत मठकर ,संजय मठकर , अनिकेत जाधव ,दामोदर मठकर उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा