You are currently viewing माडखोल धवडकी शाळेच्या श्रेयस पानोळकरच्या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड

माडखोल धवडकी शाळेच्या श्रेयस पानोळकरच्या प्रकल्पाची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात निवड

सावंतवाडी :

 

माडखोल धवडकी शाळेच्या श्रेयस पानोळकर यांची राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातून निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव शाळेला हा बहुमान प्राप्त झाला आहे. अगस्त इंटरनॅशलन फाऊंडेशन बेंगलोर यांच्या मुंबई उपशाखेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या विज्ञान प्रदर्शनात पानोळकर याचे प्रदुषणमुक्त सुरक्षित महामार्ग या विषयावर प्रकल्प ऑनलाईन सादर केला होता. त्याला विज्ञान शिक्षक अरविंद सरनोबत यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा