विद्यार्थ्यांची निवेदनाद्वारे मागणी…
महाराष्ट्र शासनाने ११ वी प्रवेशा साठी लागू केलेल्या सी ई टी परीक्षेमध्ये तंत्रशिक्षण हा विषय वगळण्यात आल्याने या परीक्षेत अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याबाबत सावंतवाडी तालुक्यातील १० वीच्या विद्यार्थ्यांनी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनातून विद्यार्थ्यांनी असे सांगितले आहे की, १० उत्तीर्ण झाल्यानंतर शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकी साठी प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण विभागाच्या धोरणाप्रमाणे समाजशास्त्र या विषयाला पर्याय म्हणून तंत्रशिक्षण हा विषय नववी व दहावी ला घेण्यात आला होता. परंतु, सी ई टी परीक्षेत इंग्रजी, गणित, शास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी समाजशास्त्र हा विषय ज्या विद्यार्थ्यांनी घेतला नव्हता त्यांचे २५ मार्क चे नुकसान होऊन, शैक्षणिक नुकसान होणार आहे. तसेच ते विद्यार्थी शास्त्र शाखेत प्रवेश घेण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे या सीईटी परीक्षेत तंत्रशिक्षण हा विषय अंतर्भूत करण्यात यावा आणि समाजशास्त्र विषयाला पर्याय म्हणून ठेवावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.