You are currently viewing दात पडक्या आप्पाच्या करामती

दात पडक्या आप्पाच्या करामती

पैसा त्याच्यासाठी ‘ किस झाड की पत्ती के बराबर….

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराचा बादशाह म्हणून नावाजलेला आणि गोव्यातील अवैध दारूचा तस्कर दात पडक्या आप्पा म्हणजे गैरधंद्यांचा किंग. त्यामुळे पैसा त्याच्यासाठी किस झाड की पत्ती के बराबर. परंतु सगळीकडेच पैसा कामी येत नाही हे आप्पाला त्यानेच सुरुवात केलेल्या प्रेमाच्या लफडयामुळे ध्यानात आलं. एकवेळ चोरटी दारू वाहतूक असो वा जुगाराची बैठक, पैसे फेकले की सहज निसटता येतं. भांडवल गेलं तरी कपडे बाकी राहतात. परंतु दात पडक्या आप्पाने आपल्याच जुगारी खेळीच्या बायकोचा मिळालेल्या नंबरचा फायदा घेत दुसऱ्याच्या पत्नीशी लगट करण्याचा केलेला प्रयत्न अंगाशी आला आणि दात पडक्या आप्पाला बाईने खोलीत डांबला.
आप्पाच्या करामती सुद्धा मोठ्या होत्या. रात्री ११, १२ वाजले की आप्पा त्या बाईला अश्लील व्हिडीओ पाठवायचा. त्यामुळे आप्पाच्या हरकतींमुळे संतापलेल्या त्या महिलेने आप्पाला धडा शिकविण्याचे ठाणले आणि घरी बोलावून खोलीत डांबून ठेवले. माफीनामा लिहून घेत दात पडक्या आप्पाची सुटका केली होती, परंतु पोलीस कस्टडीतही सुटकेसाठी न तळमळणारा आप्पा महिलेच्या घरातील खोलीत मात्र सुटकेसाठी धडपडत होता. प्रकरण मिटविण्यासाठी दात पडक्या आप्पाने सत्यवचनी हरमल वाला माणूस पाठविला होता. सत्यवचनी हरमल वाल्याने प्रकरण तडीस नेतो म्हणून आप्पाकडून जुगार खेळतानाच ५, १० हजार रुपये उचलले होते.
सत्यवचनी हरमल वाला माणूस प्रकरण मिटविण्यासाठी त्या महिलेच्या घरी गेला खरा, परंतु त्या महिलेचा रौद्रवतार पाहून पुरता हतबल झाला. महिलेशी जवळीक साधण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज, अश्लील व्हिडीओ पाठविणे, फोन करणे आप्पाच्या भलतेच अंगाशी आले. त्यामुळे अवैध धंद्यातील अनुभवापेक्षा खऱ्याखुऱ्या जीवनातील महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न मात्र आप्पाला जीवनात कटू अनुभव देऊन गेला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =