You are currently viewing “दिवस रसायनीचे” कथासंग्रहाचे प्रकाशन

“दिवस रसायनीचे” कथासंग्रहाचे प्रकाशन

निगडी प्राधिकरण – (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) :

लोकमान्य हास्ययोग संघ, लोकमान्यनगर प्रातः शाखा, साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशनस् आणि देव परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०२.०९.२०२३ रोजी शनिवारी डाॕ. नीळकंठ देव यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे “दिवस रसायनीचे” मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.

अध्यक्षस्थानी होते अतिशय कल्पक व कुशल नेतृत्वगुण असलेले संघाचे संघप्रमुख श्री. बंडोपंत फडके व्यासपीठावर प्रकाशक व काव्यानंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील खंडेलवाल, डॉ.नीलकंठ देव व ज्येष्ठ साहित्यिक व कवी श्री यशवंत देव होते.
निवेदनाची धुरा सांभाळली संघाचेच श्री. शरद महाबळ यांनी अतिशय खुसखुशीत नर्म विनोदांची पखरण करत त्यानी सूत्रसंचालन केलं. मान्यवरांचे व लेखकाचे हृद्य सत्कार व सगळ्यांचं समयोचित मनोगत यावेळी झाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाप्रमुख प्रभा भालेराव व उप शाखाप्रमुख शोभना बहिरट यांनी खूप मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा