You are currently viewing कोरोना काळात बंद असलेल्या एस. टी. बस फेऱ्या चालू करा

कोरोना काळात बंद असलेल्या एस. टी. बस फेऱ्या चालू करा

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

मालवण

मालवण आगारातून सुरू असलेल्या ग्रामीण तसेच कुडाळ कणकवली शहरात सुरू असलेल्या व कोरोना काळात बंद असलेल्या एस टी बस फेऱ्या तातडीने चालू कराव्यात अशी मागणी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांची आज दुपारी भेट घेतली.

यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख शिंदे, किरण वाळके, उपशहर प्रमुख बाळू,नाटेकर, तारी,उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, मोहन मराळ, प्रसाद आडवणकर हे उपस्थित होते. कोरोना काळात मालवण तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच कुडाळ कणकवली येथील बंद असलेल्या एसटी बस फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात तसेच मालवण तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी असलेल्या गावातील एसटी बस फेऱ्या सुरू करून नागरिकांची होणारी परवड थांबविण्यात यावी तसेच नोकर वर्गाना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त खर्च करून मालवण तालुक्यात यावे लागत आहे त्यामुळे मालवण शहरात येणाऱ्या बस फेऱ्या सुरू कराव्यात. आचरा चिंदर, मसुरे देवबाग, कुडाळ कणकवली याठिकाणच्या बस फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + five =