रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर साखरपा ते आंबा या दरम्यान आंबा घाटात १२ ठिकाणी दरड कोसळल्यामुळे व ३ ठिकाणी रस्त्याचा भाग तूटल्यामुळे महामार्गाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अजून ५ दिवस दुरुस्तीसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नुकत्याच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांना पुराचा तडाखा बसला. तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटात तब्बल १२ ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आला आहे.
रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग अजून ५ दिवस राहणार बंद
- Post published:जुलै 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments
You Might Also Like
इचलकरंजी प्रेस क्लबचा प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान
अस्वलाच्या हल्ल्यात जायबंदी झालेल्यांना आर्थिक मदत देणार – इस्माईल जळगावकर
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेशिवाय काम सुरू करू देणार नाही-नरडवे धरणग्रस्त कृती समितीचा इशारा
