अतुल रावराणे यांच्या वतीने मोफत छत्री वाटप
देवगड
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त जामसंडे येथील आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी रक्तदाते व उपस्थितांना अतुल रावराणे यांच्या तर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.
रक्तदान शिबिराच्या वेळी अतुल रावराणे, संदेश पारकर, शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, माजी सभापती रविंद्र जोगल, अमोल लोके, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, सुनिल तेली, ॲड. प्रसाद करंदीकर, राजीव वाळके, संतोष तारी, शिवसेना विभाग प्रमुख तुषार पेडणेकर, शरद लोके, शिवदास नरे, दिनेश गावकर, संदिप डोळकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल रावराणे म्हणाले कि, मुख्यमंत्री ठाकरे यांचा वाढदिवस हा फटाक्यांची आतषबाजी व बॅनर लावून साजरा नकरता समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा केला जात आहे. अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी येवून रक्तदान केले आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचले जातात. अश्याच समाजोपयोगी व समाजहिताच्या गोष्टी शिवसेना पक्ष करीत आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे हजारो बेघर घरांना या सरकारने आर्थिक मदत केली आहे. यामुळे जनतेच्या हदयामध्ये स्थान निर्माण करणारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्यामुळेच आज देशामधील आदर्श मुख्यमंत्री म्हणून ते नावाजले आहेत. यापुढेही येथील शिवसैनिक हे मुख्यमंत्रींना साजेशी अशी कामगिरी करुन पुढील येणा-या काळामध्ये सर्व निवडणुकिंमध्ये शिवसेना पक्ष अग्रेसर राहणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.