You are currently viewing ओमनी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

ओमनी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

देवगड

भरधाव ओमनी चालकाचा त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्याने मारुती ओमनी गाडी व दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी स्वार श्रेयस संतोष हिंदळेकर(२०) रा. हिंदळे हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळीं ११.३० च्या सुमारास देवगड नांदगाव मार्गावरील कट्टा कालवी येथील धोकादायक वळणावर घडला.

अपघातातील ओमनी ही गाडी देवगड ला येत होती तर श्रेयस हिंदळेकर आपली गाडी घेऊन नांदगाव च्या दिशेने जात होता या ठिकाणी मोठे वळण असल्याने दोनही वाहनचालकांना समोरील येणारे वाहन दिसत नसल्याने हा अपघात झाला असावा नागरिकांनी हिंदळेकर याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हिंदळेकर याच्या पायाला दुखापत झाली असून दोनही खांद्याना जखमा झाल्या आहेत हिंदळेकर याला पुढील उपचारासाठी ओरोस येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा