You are currently viewing वेंगुर्ल्यातील होडावडा येथे १९ जुलै रोजी दुध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा..

वेंगुर्ल्यातील होडावडा येथे १९ जुलै रोजी दुध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा..

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे मंगळवार १९ जुलै २०२२ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दुध उत्पादक शेतकऱ्यांची कार्यशाळा  स. १०.३० वा. मराठे सभागृह, होडावडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेला सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, पशु, दुग्ध, मत्स्य संस्था प्रतिनिधी तथा जिल्हा बँक संचालक, श्री. महेश सारंग, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर तसेच गोकुळ दूध संघ सहा. व्यवस्थापक पशुसंवर्धन विभाग डॉ. प्रकाश साळुंखे, पशुवैद्यकीय अधिकारी गोकुळ दूध संघ, कोकण विभाग डॉ. नितीन रेडकर व कोलगांव येथील यशस्वी दुग्ध उद्योजक श्री. ज्ञानेश्वर सावंत उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तरी शेतकरी व दुग्ध उत्पादकांनी या कार्यशाळेत उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने वेंगुर्ला विकास अधिकारी डी. आर. प्रभु आजगांवकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 5 =