बांदा
सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रोइंग डाॅटस असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची गौरवगाथा या विषयाशी निगडित कोणत्याही कलेचे सादरीकरण करावयाच्या स्पर्धेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील
इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या नील नितीन बांदेकर याने महाराष्ट्रातील शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग अतिशय उत्कृष्टरित्या सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.त्याला रोख दोन हजार व प्रमाणपत्र प्राप्त झाले. त्याच बरोबर लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पार्थ गारमेंट व मंथन पब्लिसिटी यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत निल द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
गेले वर्षभर शाळा बंद असल्यामुळे आॉनलाईन स्पर्धात्मक उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन नील बांदेकर हा स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी सुयश प्राप्त करत आहे त्याला बांदा केंद्रशाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन मिळत आहे.नीलच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी घरी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.