You are currently viewing वेर्ले येथे उद्या आरोग्य शिबिर..

वेर्ले येथे उद्या आरोग्य शिबिर..

सावंतवाडी

जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा वेर्ले क्रमांक १च्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी शतक महोत्सव समिती, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, सिंधुदुर्ग व जनसेवा प्रतिष्ठान, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात दमा, संधीवात, त्वचा रोग, स्त्री रोग आदि व्याधी वर तपासणी करून औषधोपचार करण्यास येणार आहे.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सिंधुदुर्ग पक्षनिरीक्षक सौ. अर्चना घारे परब करणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतीक सदस्य उदय भोसले व सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी उपस्थित राहणार आहेत.
तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत व शतकमहोत्सव समिती अध्यक्ष गणेश घाडी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 9 =