सिंधुदुर्ग
मराठा आरक्षण न मिळाल्याने सद्या संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनाच्या भूमिकेत आहे. दिवसेंदिवस मराठा समाज सुशिक्षित असून सुद्धा आरक्षण अभावी सरकारी नोकऱ्यापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. सद्याच्या महामारीच्या प्रादुर्भावमुळे राज्यात आर्थिक स्थिती खालावली आहे व लोक हवालदिल झाले आहेत. या स्थितीत मराठा आंदोलकांनी आंदोलन छेडले तर सरकार काय करेल. तसच या महाराष्ट्र राज्यात अखंड मराठा समाजच्या आरक्षणसाठी होऊ घालणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व खा. उदयनराजे भोसले व खा. संभाजीराजे भोसले यांनीच करावे. या दोन्हीवरच आता आशा टिकून आहेत असे सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजचे जेष्ठ नेते श्री लवू वारंग यांनी सांगितले. सर्व मराठा बांधवांना असे सांगितले की, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा बांधवानो ही आंदोलनाची आग विझवू देऊ नका.तसेच शेवटी ते म्हणाले की, या आंदोलनाचा केव्हाही भडका उडू शकतो याची केंद्र व राज्य सरकार यांनी दखल घ्यावी.