रस्त्यालगत असलेली आंब्याच्या बागेचेही नुकसान
वैभववाडी
अतिवृष्टीमुळे मौंदे येथील रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.तर रस्त्यावर असलेली मोरी दगड व मातीने भरल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहात आहे.रस्त्या लगत असलेली गंगाराम कांबळे यांची आंब्याची बाग असून या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टी सुरु होती.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने मौंदे ते असलजकडे जाणाऱ्या रस्त्यावर यावर्षीच डांबरीकरण करण्यात आले होते.माञ गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्णपणे उखडून पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे.रस्त्यावर असलेली मोरी दगड माती गाळाने भरल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या रस्त्या लगत मौंदे येथील गंगाराम कांबळे यांची आंब्याची बाग आहे.या बागेत पाणी घुसल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत मौंदे सरपंच अनंत कांबळे यांनी गटविकास अधिकारी वैभववाडी व बांधकाम विभागाशी संपर्क साधला असून या नुकसानीची पहाणी करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा.तसेच आंबा बागेचा कृषी विभाकडून पंचनामा करुन नुकसानभरपाई देण्यात यावी.अशी मागणी सरपंच कांबळे यांनी केली आहे.