You are currently viewing मडुरा पुलाच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू

मडुरा पुलाच्या मंजुरीसाठी उपोषण सुरू

माऊली मंदिराजवळ ग्रामस्थ, वाहनचालक व प्रवाश्यांची उपस्थिती

बांदा

मडुरा-सातोसे-कवठणी-किनळे रस्त्यावरील श्री देवी माऊली मंदिर पुल व सातार्डा येथील मोरीपूलाच्या मंजुरीसाठी मडुरा पुलावर बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी श्री देवी माऊली दशक्रोशी रस्ता समितीचे अध्यक्ष जगन्नाथ पंडित, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोस्कर, माजी सरपंच आनंद परब, सातोसे सरपंच बबन सातोस्कर, पाडलोस सोसायटी चेअरमन सुभाष करमळकर, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, प्रवीण पंडित, भिकाजी धुरी, यशवंत माधव, ग्रा. पं. सदस्य सखाराम परब, तसेच उदय चिंदरकर, विलास पावसकर, दत्ताराम परब, ज्ञानेश परब, बाळू परब, प्रताप परब, पिंट्या परब, प्रकाश वालावलकर, शांताराम परब, कृष्णा परब, दिलीप परब, दिलीप गावडे, अनु गावडे, कृष्णा केरकर, दाजी सातरडेकर, अर्जुन शेरलेकर, अरुण पंडित, किरण प्रभू, मोहन तळवणेकर, नारायण परब, नितीन खर्डे, श्रीकृष्ण भोगले आदींसह शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा