You are currently viewing बांदा येथे गोठा कोसळून म्हैस ठार, तर दोन म्हैशी पुरात वाहून गेल्या…

बांदा येथे गोठा कोसळून म्हैस ठार, तर दोन म्हैशी पुरात वाहून गेल्या…

बांदा

येथील मुस्लिमवाडी परिसरात असलेल्या दाऊद आगा यांचा गोठा कोसळून १ म्हैस ठार झाली,तर २ म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने आगा यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यांचे घर तेरेखोल नदीचा किनारी आहे. बांदा शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बांद्यात महापुराने हाहाकार उडाला असून कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. दुकाने, घरातील साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे.

आगा यांचा गोठा मुस्लिमवाडी येथे तेरेखोल नदी किनाऱ्यालगत आहे. पुराच्या पाण्याचा तडाख्याने गोठा कोसळला. याठिकाणी पाण्याचा वेग अधिक असल्याने गुरांना वाचविणे शक्य झाले नाही. गोठा कोसळल्याने एक म्हैस जागीच गतप्राण झाली. तर दोन म्हैशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याचबरोबर गोठ्याचे लाकडी छप्पर, शेतीपंप देखील वाहून गेलेत. यामध्ये आगा यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =