You are currently viewing शिवसेनेच्या वतीने उद्या कुडाळ येथे कोविड योध्यांचा सत्कार

शिवसेनेच्या वतीने उद्या कुडाळ येथे कोविड योध्यांचा सत्कार

कुडाळ

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला रुग्णालय कुडाळ, मधील कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले सर्व डॉक्टर, नर्स व इतर सर्व कर्मचारी यांचा शिवसेनेच्या वतीने रविवार दि. २५/०७/२०२१ रोजी सकाळी ११ वाजता महिला रुग्णालय कुडाळ येथे आमदार वैभवजी नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष मा. सतीशजी सावंत, मा. संदेशजी पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. संजयजी पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे तरी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री अमरसेन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख श्री राजन नाईक व शहर प्रमुख श्री संतोष शिरसाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा