You are currently viewing गुरू माझे

गुरू माझे

अष्टाक्षरी भक्तीगीत

आद्य गुरू मायबाप!
दुसरे ते गुरुजन !!
गुरू माझे काडसिद्ध !
मंदिरात समाधीन. !!

वचन बोलती ऐसे !
श्रवणती भक्तिभावे !!
करुनी जे आत्मसात !
चरणी त्या लीन व्हावे !!

गुरू मायेचा सागर !
स्वयं तो परमेश्वर !!
गुरू भक्तीचा आगर !
मानव रुपी ईश्वर !!

गुरुविण दुजा कोण !
जीवनाची नौका तारी !!
नेती कोण सांभाळूनी !
नाव माझी पैलतीरी !!

गुरुमंत्र दिक्षामंत्र !
गुरुप्रती हे वचन !!
सर्वार्थाने केलेले ते !
निःसंशय समर्पण !!

उतणार मातणार !
नाही टाकणार वसा !!
गुरुर्वाक्य प्रमाणं ते !
जीवनी गुरूचा ठसा !!

©(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 7 =