मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन..

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन..

कुडाळ
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने तसेच आमदार मा.वैभव नाईक यांच्या सहकार्याने शुक्रवार ते सोमवार कालावधीत कुडाळ शहरामध्ये विविध ठिकाणी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. २३/०७/२०२१ रोजी सकाळी ९ ते १२ वा. या वेळेत दैवज्ञ भवन हॉल व ब्राह्मणदेव वडाचे झाड खालची कुंभारवाडी या दोन ठिकाणी शिबीर संपन्न होणार आहे. तरी कुडाळ शहरातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते व शिवसैनिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख श्री राजन नाईक व शिवसेना शहर प्रमुख श्री संतोष शिरसाट यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा