फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प : लोरे येथील पूल पाण्याखाली

फोंडा मार्गावरील वाहतूक ठप्प : लोरे येथील पूल पाण्याखाली

शिवगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

वैभववाडी
वैभववाडी तालुक्याला आजही सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले. कोसळणाऱ्या पावसामुळे लोरे शिवगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वैभववाडी – फोंडा मार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आज सकाळपासून अक्षरशा तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. तालुक्यातील सुख व शांति या प्रमुख नद्या आज सकाळपासून दुथडी भरून वाहत आहेत. लोरे येथील शिवगंगा नदीला मोठा पूर आला आहे. वैभववाडी – फोंडा मार्गावर पुराचे पाणी आले आहे. या मार्गावरील पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा