कणकवलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

कणकवलीत वादळी वाऱ्यासह पाऊस

शहरात घरावर कोसळले झाड;नगरपंचायत पथक घटनास्थळी दाखल

कणकवली

आज सकाळपासून कणकवलीसह ग्रामीण भागात सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसामुळे झाडांची पडझड सुरू झाली आहे. कणकवली शहर सह ग्रामीण भागांत देखील दमदार पाऊस व वादळी वारा झाल्याने घरावर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कणकवली शहरातील हर्णे आळी भागात संतोष ठाणेकर यांच्या घरावर झाड उन्मळून पडले असून, त्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत चे पथक झाड हटविण्यासाठी तेथे दाखल झाले असून, झाड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा